Uddhav Thackeray । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. यानंतर ठाकरे गटाला कायमच धक्क्यावर धक्के बसले. अनेक बड्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. मागच्या अनेक महिन्यांपासून ठाकरे गटाला लागलेली गळतीअजूनही कायमच आहे. सध्या देखील बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. (Uddhav Thackeray)
बीड मधल्या दोन बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. बीड बाजार समितीमधील शिवसेनेच्या उपसभापती आणि दोन संचालकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हा राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
बीड शहरामध्ये पत्रकार परिषद घेत या नेत्यांनी राजीनाम्याची माहिती दिली आहे. शिवसेनेमधील खांदेपालट करून नवीन जिल्हाप्रमुख निवडल्याने या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आणि याचाच एक भाग म्हणून उपसभापती आणि दोन संचालकांनी राजीनामा दिला आहे.