Headlines

Rain Update । मोठी बातमी! उद्यापासून राज्यातील ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस

Spread the love

Rain Update । सध्या पावसाचा काही भरोसा राहिलेला नाही. कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. अवकाळी पडण्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे. दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात कोरड्या हवामाना अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे.

त्याचबरोबर हिंगोली, नांदेड, परभणी आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून पुणे, कोल्हापुर, जळगाव, रायगड, सातारा, सांगली, पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, लातूर, धारशिव, जालना, बीड, अमरावती, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, यवतमाळ जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Add copyright symbol

Welcome To Krushi Salla

© Copyright, Krushi Salla