PanCard । आयकर विभाग तुमच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी पॅन कार्ड जारी करतो. पॅन कार्ड हे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते आणि पैशांच्या व्यवहारांशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आयकर विभाग पॅन नंबरद्वारे व्यवहारांचा मागोवा घेऊ शकतो. 30 जूनपर्यंत आधारशी लिंक न केल्यामुळे 11 कोटींहून अधिक पॅनकार्ड रद्द करण्यात आली आहेत. म्हणजेच आता हे पॅन कार्ड वापरता येणार नाही. रद्द केलेला पॅन वापरल्यास 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या म्हणण्यानुसार, १ जुलैनंतरही आधारशी लिंक न झालेल्या पॅनकार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 11.5 कोटी पॅन रद्द करण्यात आले आहेत. पॅन कार्ड रद्द केल्यामुळे पैशांच्या व्यवहारांसह अनेक प्रकारची आर्थिक संबंधित कामे करणे कठीण होणार आहे. तुम्हाला पॅन कार्ड सक्रिय करायचे असल्यास, ऑनलाइन पद्धती येथे नमूद केल्या आहेत, ज्या तुम्ही फॉलो करू शकता.
पॅन सक्रिय करण्याचा ऑनलाइन मार्ग
पॅन सक्रिय करण्यासाठी, आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometax.gov.in/iec/foportal/ वर जावे लागेल.
यानंतर ‘ई-पे टॅक्स’ पर्यायावर क्लिक करा
आता पॅन कार्डशी संबंधित आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
यानंतर, CHALLAN NO./ITNS 280 वर जाऊन फी भरा.
आता मूल्यांकन वर्ष निवडा आणि कॉलममध्ये पत्ता लिहा.
यानंतर, कॅप्चा कोड भरा आणि Proceed पर्यायावर क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांनी तुमचा पॅन पुन्हा सक्रिय होईल.