कोण आहेत मनोज जरांगे?
मनोज जरांगे पाटील यांनी कधीकाळी उपजिविकेसाठी हॉटेलमध्ये काम केले. मराठा आंदोलनासाठी त्यांनी स्वत:ची जमीन विकली. आता हे नाव राज्यातील घराघरापर्यंत गेले आहे. मनोज जरांगे पाटील मुळचे बीड जिल्ह्यातील रहिवाशी. मोतोरी हे त्यांचे गाव. काही वर्षांपूर्वी त्यांनी बीडमधून जालनाकडे आपला मुक्कम हलवला. त्यांच्या घरच्या परिस्थितीचा आपण विचार केला तर त्यांची परिस्थिती सामान्य होती.
सामान्य परिस्थिती असल्यामुळे त्यांनी उपजिविकेसाठ एकेकाळी हॉटेलमध्ये काम केले. पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते समाजात जाऊ लागले. चर्चा करु लागले. मग मराठा आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च्या जमीन विकली. त्यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने देखील केले. आणि आता सध्या त्यांचे नाव घराघरात पोहचले आहे.