IMD Alert । सध्या देशभरात वातावरणात मोठे बदल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. कधी पाऊस पडतोय, कधी कडाक्याची थंडी वाजतेय तर कधी उन्हाच्या झळा देखील नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. दरम्यान आयएमडीने पावसाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
आयएमडीने वर्तविलेल्या अंदाजानुसार, 20 तारखेपर्यंत तामिळनाडू आणि केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, 21 नोव्हेंबरला कोस्टल आंध्र प्रदेश आणि 22 नोव्हेंबरला तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. या राज्यांमध्ये 22 नोव्हेंबरपर्यंत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट दिसून येईल. अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. असा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.
IMD ने देशाच्या काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवली आहे. IMD नुसार, 19 नोव्हेंबर रोजी पूर्व आणि दक्षिण आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागात दाट धुके पडू शकते. याशिवाय देशातील उर्वरित भागात कोणताही मोठा हंगामी बदल होण्याची शक्यता नाही.