पंडित शशी शेखर मिश्रा यांच्यानुसार यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन शुभ योगही तयार होत आहेत. यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:44 वाजता सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:14 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार या वर्षी 24 ऑक्टोबरला दसरा सण साजरा केला जाणार आहे.
रावण दहन मुहूर्त
दसऱ्याच्या दिवशी लंकापती रावण, त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि मुलगा मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. पुतळ्याचे दहन योग्य वेळी केले तरच शुभ मानले जाते. विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबरला पुतळा दहनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५.४३ ते सूर्यास्तापर्यंत अडीच तास असेल.
दसरा का साजरा केला जातो?
भगवान रामाच्या 14 वर्षांच्या वनवासात लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते. त्यानंतर प्रभू राम, लक्ष्मण, हनुमान आणि वानरसेना यांनी माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी युद्ध केले. प्रभू राम आणि रावण यांच्यात अनेक दिवस भयंकर युद्ध झाले. असे मानले जाते की भगवान रामाने 9 दिवस दुर्गा देवीची पूजा केली आणि 10 व्या दिवशी रावणाचा वध केला. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाने लंकापती रावणाचा वध केला होता.
रावणाचे वाढते अत्याचार आणि अहंकार संपवण्यासाठी भगवान विष्णूंनी रामाचा अवतार घेतला आणि रावणाचा वध करून पृथ्वीला रावणाच्या अत्याचारापासून मुक्त केले. दसरा हा सण रावणावर म्हणजेच दुष्टावर विजय साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. म्हणून या सणाला विजय दशमी असेही म्हणतात.