शेतकऱ्यांसाठी सध्या एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवारी (ता. २६) केले जाणार आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे वितरण केले जाईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे.
नमो शेतकरी योजनेचे (Namo Shetkari Sanman Scheme) 6000 रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक सहारा मिळणार आहे. काही दिवसातच रब्बी पेरणीची सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची गरज भासते यामुळे जर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.