LPG Price । नोव्हेंबरपूर्वी महागाईचा मोठा धक्का बसला असून तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 101.50 रुपयांची वाढ झाली आहे. नवीन दर बुधवारपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे. याआधी १ ऑक्टोबरलाही व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २०९ रुपयांनी वाढले होते.
तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली असली तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये आहे, तर कोलकातामध्ये 14 किलोचा सिलेंडर 929 रुपयांना विकला जात आहे. मुंबईत एलपीजीची किंमत ९०२.५ रुपये आहे, तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडर ९१८.५ रुपयांना विकला जात आहे.
प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत
या वाढीनंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये 19 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत 1943 रुपये झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईत 1785.50 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 1999.50 रुपयांना मिळणार आहे.