Headlines

Maratha Reservation । मराठा आरक्षणावरून मोठा गदारोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखवले काळे झेंडे, २१ जण ताब्यात

Spread the love

Maratha Reservation । सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा बांधव आता एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. त्याचबरोबर नेत्यांची ताफे अडवण्यात येत आहे. जर एखादा नेता गावाच्या किंवा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेल तर त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात येत आहेत. सध्या देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याना काळे झेंडे दाखवल्याची माहिती समोर आली आहे.

लातूर शहरात मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. बावनकुळे हे दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मराठा संघटनेच्या 21 जणांना ताब्यात घेतले आहे. कार्यकर्त्यांच्या गटाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. बावनकुळे शहरात असेपर्यंत २१ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन विविध पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Add copyright symbol

Welcome To Krushi Salla

© Copyright, Krushi Salla