Bank Holiday । नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात अनेक सण आणि कार्यक्रम होत असतात. त्यामुळे बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या देण्यात येणार आहेत. या महिन्यात 15 दिवस बँक बंद राहणार आहे. जर तुमचेही या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर घर सोडण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी नक्कीच तपासा. वास्तविक, रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या कॅलेंडर यादीनुसार, भारतातील विविध राज्यांमध्ये रविवार, दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार असे एकूण १५ दिवस बँका बंद राहणार आहेत.
नोव्हेंबरमध्ये या दिवसात बँका बंद राहतील
१ नोव्हेंबर २०२३- (बुधवार) कन्नड राज्योत्सवाचे प्रसंग, करवा चौथ (कर्नाटक, मणिपूर आणि हिमाचल प्रदेश)
5 नोव्हेंबर 2023- (रविवार) साप्ताहिक सुट्टी, (सर्वत्र)
10 नोव्हेंबर (शुक्रवार) वांगला महोत्सव, (मेघालय)
11 नोव्हेंबर (शनिवार) महिन्याचा दुसरा शनिवार.
12 नोव्हेंबर (रविवार) साप्ताहिक सुट्टी, (सर्व ठिकाणी)
13 नोव्हेंबर (सोमवार) गोवर्धन पूजा, लक्ष्मी पूजा (दिवाळी), (त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र) निमित्त
14 नोव्हेंबर (मंगळवार) दिवाळी, बली प्रतिपदा, विक्रम संवंत नववर्ष दिन, लक्ष्मी पूजा, (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि सिक्कीम)
15 नोव्हेंबर (बुधवार) भाईदूज, चित्रगुप्त जयंती, लक्ष्मी पूजा, निंगोल चक्कौबा, (सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, बंगाल आणि हिमाचल प्रदेश)
19 नोव्हेंबर (रविवार) साप्ताहिक सुट्टी, (सर्व ठिकाणी)
20 नोव्हेंबर (सोमवार) छठ सण, (बिहार आणि राजस्थान)
२३ नोव्हेंबर (मंगळवार) सेंग कुत्स्नेम, इगास-बागवाल, (उत्तराखंड आणि सिक्कीम)
25 नोव्हेंबर (शनिवार) महिन्याचा चौथा शनिवार
26 नोव्हेंबर (रविवार) साप्ताहिक सुट्टी, (सर्व ठिकाणी)
27 नोव्हेंबर (सोमवार) गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा, रहस पौर्णिमा, (त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओरिसा, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बिहार, झारखंड) , हिमाचल प्रदेश)
30 नोव्हेंबर (गुरुवार) कनकदास जयंती (कर्नाटक)